मनसे स्वाक्षरी मोहिमेच्या कार्यक्रमात राज ठाकरे विनामास्क! गर्दीबाबत विचारल्यावर भडकले, म्हणाले...

 मुंबई : मनसे प्रमुख राज ठाकरे हे अनेकदा विनामास्क सार्वजनिक कार्यक्रमात दिसून आले आहेत. आज मराठी भाषा गौरव दिनाच्या निमित्ताने मनसेच्या मराठी स्वाक्षरी मोहिमेच्या कार्यक्रमाला ते विनामास्क उपस्थित होते. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारनं मनसेच्या कार्यक्रमाला परवानगी नाकारली. सरकारच्या निर्णयावर राज ठाकरे यांनी संताप व्यक्त केला.


मी मास्क घालतच नाही


ते म्हणाले की, सगळ्या कार्यक्रमांना गर्दी होते. सरकारच्या कार्यक्रमांना गर्दी होते. ते तिथं धुडघुस घालू शकतात. शिवजयंती, मराठी भाषा दिनाच्या कार्यक्रमांना परवानगी नाकारली जाते. एवढं जर कोरोनाचं संकट पुन्हा येतंय असं दिसत असेल तर सगळ्या निवडणुका पुढे ढकला, असं राज ठाकरे म्हणाले. मी मास्क घालतच नाही, मी तुम्हालाही सांगतो, असं राज ठाकरे म्हणाले.


Comments